वर्धा : राज्य शासनाने वर्धा येथे रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यासाठी वर्धेलागत सातोडा येथे जागाही निश्चित केली. मात्र, हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे म्हणून आंदोलन सुरू झाले. आधीच दोन महाविद्यालये सुरू असल्याने वर्धेत तिसरे महाविद्यालय कशाला, असा युक्तिवाद करीत हिंगणघाट बंद पाळण्यात आला. आता आर्वीकरांनीही या महाविद्यालयाची मागणी करीत रेटा देणे सुरू केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तळेगाव येथे जागा उपलब्ध असून आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निवेदन देत स्पष्ट केले. सेवाग्राम व सावंगी रुग्णालय हे सत्तर किलोमीटर दूर अंतरावर असल्याने या भागातील रुग्णांना तेथील वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच महामार्गावर नित्य अपघात होतात. अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकत नाही. म्हणून आर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी योग्य ठिकाण असल्याचा दावा झाला.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?

हेही वाचा – वर्धा : ऐकलं का? म्हणे, विद्यापीठातील मूर्तीचे नाक जनावरांनी तोडले; पोलिसांचा अफलातून तर्क

प्राप्त माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे हेसुद्धा आर्वीत वैद्यकीय महाविद्यालय खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्यांची येथील लोकसेवा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पत्रकार विजय अजमिरे म्हणाले की, आर्वीत हे महाविद्यालय व्हावे म्हणून पडद्यामागे प्रयत्न सुरू झाले आहे. तळेगाव येथे जागेची चाचपणी झाल्याची माहिती मिळते. राजकीय वजन पुरेसे असल्याने आर्वीचा दावा मजबूत ठरतो.