अकोला : पारस येथील दुर्घटनेत सात जणांचे बळी गेले, तर अनेक जण जखमी झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शेजारच्या अमरावती जिल्ह्यात आले. मात्र, त्यांनी अकोला जिल्ह्यातील दुर्घटनाग्रस्त पारस गावाला भेट दिली नाही. ज्यांना पालक शब्दाचा अर्थच कळत नाही, त्या बालकाबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारस दुर्घटनेतील जखमींची सावंत यांनी मंगळवारी विचारपूस केली. जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती व फळबागाची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘पारस येथे मोठी आपत्ती कोसळली. काही घरे देखील पडली आहेत. राज्य सरकारने त्वरित मदत करायला हवी होती. शिवसेनेने त्यांना मदत केली. जे घडले ते अत्यंत वाईट आहे. मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारी संघटना केवळ शिवसेना आहे. बाकी राजकारण सुरूच राहणार आहे. ज्यांना पालक शब्दाचा अर्थच कळत नाही, त्यांनी बालकांबद्दल कशाला बोलावे.

हेही वाचा >>>नागपूरच्या सभेचा वाद न्यायालयाता जाणार

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. पिके आडवी झाली आहेत. फळबागांना मोठा फटका बसला. सर्वसमावेशक विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. हे सरकार केवळ यात्रावर यात्रा करणारे आहे, बाकी काही करणार नाही, अशी टीका खा. सावंत यांनी सरकारवर केली.