भंडारा : अखेर गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी ३३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले गेले आहे. संपूर्ण ३३ दारातून ३७३४.४२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला अरेंज अलर्ट दिला असून मागील २४ तासांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी वरून वाहत आहेत. समतल भागात पाणी साचत असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोसमात पहिल्यांदाच गोसेचे ३३ ही दरवाजे उघडले गेले आहेत. मागील २४ तासात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने तसेच गोसीखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत होती, त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसीखुर्द धरण प्रशासनाने संपूर्ण ३३ दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला धरणात येणाऱ्या पावसाचा प्रवाह लक्षात घेऊन दार उघडण्याचे प्रमाण कमी जास्त केले जात आहे.

हेही वाचा >>>हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांना पुराचा इशारा

हेही वाचा >>>नागपूर: मंदिर वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे, जाणून घ्या कारणे…

वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवाना नदी पात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय नदी काठावरील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. आता पर्यंत भंडारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून या तालुक्यात ८८ टक्के पाऊस पडला आहे सध्या वैनगंगेच्या कारधा नदीपत्राची पाणी पातळी २४३. ३२ मीटर असून धोक्याची पातळी २४५ मीटर एवढी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As all 33 gates of gosekhurd dam have been opened orange alert has been issued by meteorological department today ksn 82 amy
Show comments