वर्धा: घरमालक व भाडेकरू यांच्यातील संबंध कधी प्रेमाचे तर कधी वादाचे.भाड्यावरून तगादा आणि वादावादी होण्याचे प्रकार आपण पाहतोच.पण इथे तर भाडेकरू चक्क तलाठी व घरमालक शेतकरी असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार.हिंगणघाट तालुक्यातील खानगावची ही कथा.येथील कमल वासुदेव चिरडे यांच्या घरी भाड्याने तलाठी कार्यालय आहे.दरमहा एक हजार रुपये २०१३ पासून आकारल्या जात आहे.
तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे १२३ महिन्याचा कालावधी झाला.मिळाले फक्त २४ हजार रुपये.९९ महिन्याचे भाडे अद्याप थकीत आहे.निधी नसल्याचे कारण दिल्या जाते. शासकीय आहे म्हणून थोडा दिलासा.पण कुठवर थांबणार म्हणून प्रथम तहसील व मग थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली.निधी नाही हेच उत्तर मिळते.पण आता करणार काय, उंट तर तंबूत शिरलाय.