नागपूर: तलाठी भरतीची परीक्षा १७ ऑगस्ट पासून सकाळी सुरू झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यानंतर आता परीक्षेत सर्व्हर डाऊन असल्याची समस्या येत आहे. सोमवारी सकाळी ९ वाजताच्या पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ९ वाजल्या नंतरही विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला.

नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला. असाच प्रकार अमरावतीमध्येही घडल्याची माहिती आहे. या प्रकाराने परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा… …म्हणून शिंदे स्वप्नातही मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडून ठेवतात; वडेट्टीवार यांचा टोला

राज्यात यंदा चार वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत आहे. यासाठी दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केला आहे. गुरुवार १७ ऑगस्टपासून राज्यातील विविध केंद्रांवर या परीक्षेला सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजता पहिल्या पाळीतील परीक्षा होती. याचवेळी पेपरसाठी उमेदवार परीक्षा केंद्रावर गेले असता सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ९ वाजता नंतरही विद्यार्थ्यांना बाहेरच ठेवण्यात आले होते.

Story img Loader