गोंदिया : अजित पवार यांनी २ जुलैला पुकारलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे.राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करताच शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. पण मध्यंतरी एकत्रीकरण, मनोमिलन , मनधरणी चे सर्व प्रयत्न अजित पवार/ प्रफुल पटेल यांच्या कडून करण्यात आले त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.एकंदरीत त्या दरम्यान झालेली सर्व चर्चा फिस्कटली त्यानंतर देशव्यापी विरोधी पक्षाची बंगळुरू येथील बैठकीत सहभागी झाल्यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे वळवला आहे.

गोंदिया मध्ये येत्या शुक्रवार २८ जुलै रोजी शरद पवार गटाचा मेळावा कशिश सभागृह येथे होणार आहे. या मेळाव्या करिता जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्याला शरद पवार गटाचे कोणते नेते उपस्थित राहणार आहेत, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण सध्या गोंदियात शरद पवार गटाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संगठन सचिव वीरेंद्र जायस्वाल हे करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला असलेल्या गोंदिया जिल्हाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. गोंदिया मधून शरद पवार यांना कोण पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सुरुवातीला वीरेंद्र जायस्वाल यांनी देखील अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. मात्र ते आता पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे आले आहेत.

हेही वाचा >>>यवतमाळ: भर पावसात अर्धनग्न आंदोलन; मारेगावात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त

मेळाव्यातच जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

हा प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या २८ जुलै ला गोंदियामध्ये राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. याच मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येईल, या मेळाव्यात कोणते नेते सहभागी होणार आहेत, याबाबत लवकरच माहिती दिली जाईल. मेळाव्यानंतर सायंकाळी शरद पवार स्थानिक माध्यमांशी पत्र परिषदेच्या माध्यमातून संवाद साधणार अशी माहिती शरद पवार गटाचे प्रदेश संगठन सचिव वीरेंद्र जयस्वाल यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली आहे.

Story img Loader