नागपूर : साध्याभोळ्या आईच्या नकळत वडील पबमध्ये भेटलेल्या तरुणीच्या प्रेमात पडले. तिच्यावर लाखो रुपये खर्च करायला लागले. वडिलाच्या इंस्टाग्रामवर तरुणीसोबत नृत्य करतानाची रिल्स मुलीने बघितली आणि वडिलांचे प्रेमप्रकरण उघडकीस आले. मुलीने आईसह भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तिघांचेही समूपदेशन करून संसार वाचवला.

संजय (४५, इतवारी) हा व्यापार करतो. नोकर-चाकर असलेल्या कुटुंबातील मुलीशी त्याचे लग्न झाले. एक मुलगा आणि मुलगी झाली. संजयच्या व्यवसायानेही उभारी घेतली. पैसा येताच संजयला दारूचे आणि डान्सबारचे व्यसन लागले. तो पबमध्ये जाऊन पैसे उडवायला लागला. एमआयडीसीमधील एका पबमध्ये त्याला रितू (२०, काल्पनिक नाव) भेटली. ती मित्राची वाट बघत होती, परंतु तो न आल्यामुळे संजयने तिला हेरले. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि त्यांच्यात संवाद सुरु झाला. तिने संजयकडे असलेला पैसा बघितला आणि त्याला जाळ्यात ओढले. संजयनेही तिच्यावर वारेमाप खर्च करण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे दोघांच्या महागड्या हॉटेलमध्ये भेटी व्हायला लागल्या. दोघेही शारीरिक संबंध ठेवायला लागले. रितूने त्याला फ्लॅट मागितला आणि फिरायला कार मागितली. संजयने लगेच दोन्ही मागण्या पूर्ण करीत तिला महागडा आयफोन भेट दिला.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Son gifted father Mercedes on his 65th birthday emotional video goes viral on social media
VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”

हेही वाचा – नऊ नवीन आरटीओ कार्यालयांच्या जबाबदारींचे वाटप, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

इंस्टाग्रामवरील लाईक्सने केला घोळ

रितू सदनिकेत मित्र आणि मैत्रिणींसह राहायला लागली. तिचा वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये संजयने साजरा केला. रितूबरोबर दर शनिवारी-रविवारी पबमध्ये जायला लागला. संजयच्या २० वर्षीय मुलीने वडिलांच्या इंस्टाग्रामवरील ‘रिल्स’ बघितल्या. वडिलाच्या प्रत्येक छायाचित्राला रितूचे ‘लाईक्स’ असल्याने मुलीला संशय आला. तिने रितूला ‘फॉलो’ केले असता हा प्रकार समोर आला.

हेही वाचा – नागपूर : राष्ट्रपतींच्या कार्यक्रमावर लक्षावधींचा खर्च, रुग्णांची मागणी दुर्लक्षित, पेशंट राईट फोरम उपोषण करणार

अखेर ‘भरोसा सेल’ने सोडवला गुंता

वडिलांना पैशांसाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची माहिती रितूने आईला सांगितली. तिच्या आईला धक्काच बसला. त्यांनी वडिलाच्या प्रेयसीला फोन करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. अखेर भरोसा सेल गाठले. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी तिघांचेही समूपदेशन केले. रितूनेही घरापर्यंत प्रकरण जाऊ नये म्हणून माघार घेतली. संजयने पत्नी अंजली व मुलीची माफी मागून रितूचा नाद सोडला.

Story img Loader