वर्धा: दिवाळी आठवड्यावर येऊन ठेपल्याने शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सिंदी बाजार समितीत तर झुंबड उडाली आहे. सेलू उपबाजार पेठेत तर गत आठ दिवसात ३९ हजार ८०० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. त्यापोटी शेतकऱ्यांना १५ कोटी ९२ लाख ६४ हजार रुपये देण्यात आले.
सोयाबीन साठी ४ हजार ७५० रुपये क्विंटल असा दमदार भाव मिळत आहे. सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून बाजार समितीत रात्री उशिरा पर्यंत खरेदी होत आहे.
हेही वाचा… सावधान! शासकीय नोकरीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रीय
प्रसंगी शेतकरी थंडीत कुडकुडत मुक्काम करतात. पण माल विकून पैसे हाती पडल्यावरच घरी जाणे पसंत करतात.त्यासाठी समितीने गादी, ब्लँकेटची पण सोय केली असल्याचे संचालक सांगतात. सोयाबीन नंतर हरभरा पेरणीची घाई व दिवाळी यामुळे बाजारपेठ फुलून गेल्याचे चित्र आहे.