नागपूर: प्रेयसीचा पहिला प्रियकर तिला त्रास देत असल्यामुळे दुसऱ्या प्रियकराने दोन साथिदारांच्या मदतीने युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना बुधवारी भरदुपारी दोन वाजता घडली. अभिनव ऊर्फ श्यांकी रविंद्र भोयर (२२, बारसेनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. कशिश महाजन असे आरोपीचे नाव आहे. श्यांकीने २०१८ मध्ये एकाचा खून केला होता तर तीनही आरोपी कुख्यात गुंड आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्यांकी भोयर हा मेयो रुग्णालयाजवळील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता. त्याचे मेडिकल चौकात राहणाऱ्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रेयसीचे कशिश महाजन या युवकाशी सूत जुळले. ती दोघांशीही प्रेमसंबंध ठेवत होती. २०१८ मध्ये महाजनच्या दुचाकीवर प्रेयसीला जाताना बघितल्यानंतर दोघांत वाद झाला होता. तेव्हाही कशिशने श्यांकीवर चाकूहल्ला केला होता. या प्रकरणीसुद्धा पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा… बुकी जैनच्या लॉकरमध्ये आढळले घबाड; ४ कोटींचे सोने आणि अडीच कोंटींची रोख

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेयसीने संबंध ठेवण्यास नकार देत कशिशसोबत लग्न करणार असल्याचे श्यांकीला सांगितले. प्रेयसीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या कशिशला खून करण्याची धमकी श्यांकीने दिली होती. श्यांकीच्या धमकीमुळे चिडलेल्या कशिशने त्याचा काटा काढण्याचा कट रचला. बुधवारी दुपारी दोन वाजता तो बारसेनगरातील चहाटपरीवर गेला. तेथे सापळा रचून बसलेल्या कशिश आणि त्याच्या साथिदारांनी श्यांकीवर चाकूने हल्ला करून खून केला आणि पळ काढला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.