नागपूर: दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर जम्मू-काश्मीर, लेह, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊ लागल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या काही दिवसात राज्यात किमान तापमानात हळूहळू आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागात गारठा वाढत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढू लागली आहे. उत्तर प्रदेशमध्येही तापमानात हळूहळू घट होत आहे. यासोबतच नोव्हेंबर महिना सुरू होताच धुकेही वाढणार आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याशिवाय उत्तराखंडसह जम्मू-काश्मीर, लेह, लडाख आणि हिमाचल प्रदेशातही बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा… गेट सेट गो… ‘इंडिगो’चे लवकरच गोंदियातील बिरसी विमानतळावरून ‘टेक ऑफ’, डिसेंबरपर्यंत प्रवासी सेवेचा…

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबरला दक्षिण कर्नाटकात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As the minimum temperature has started to decrease in maharashtra the winter has started rgc 76 dvr
Show comments