देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या पूर्व, मुख्य आणि अंतिम परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
‘एपीएससी’ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अधिकारी होण्याच्या अपेक्षेने या परीक्षेची तयारी करतात. मात्र, परीक्षेत येणाऱ्या अपयशापेक्षा त्यांना सर्वाधिक चिंता असते ती वेळेत जाहीर न होणाऱ्या निकालाची. मागच्या वर्षी पुणे येथील एका विद्यार्थ्याने निकालासाठी विलंब होत असल्याने आत्महत्या केली होती. यानंतर शासनाने निकालाची प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. निकाल कधी जाहीर होणार यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाकडे विचारणा केली असता प्रतिसाद मिळाला नाही.

हेही वाचा >>>नवीन विद्यापीठ व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य? अपुऱ्या निधीमुळे अमरावती विद्यापीठाचेच कार्य प्रभावित

या परीक्षांचे निकाल प्रलंबित…

राज्यसेवा २०२२ ची मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये झाली असून निकाल लागलेला नाही. संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ऑक्टोबर २०२२ झाली, पण अद्या निकाल नाही. एप्रिल २०२३ मध्ये झालेली अराजपत्रित संयुक्त परीक्षा, लिपिक मुख्य २०२३ च्या परीक्षेचाही निकाल प्रलंबित आहे.

हेही वाचा >>>नागपूर: भारतातील महामार्गांना आता गडकरींचे “बाहू बल्ली” कुंपण

दोन वेळा चाचणी होऊनही निकाल नाही

आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संवर्गातील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदाच्या भरतीत लिपिक टंकलेखक पदाच्या ११६४ जागांसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची दोन वेळा दहा मिनिटांची टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली. पण, अद्याप अंतिम निकाल न लावल्याने परीक्षार्थी संतप्त झाले आहेत. आयोगाने टंकलेखनाचा उतारा जाहिरातीत दिलेल्या निकषांपेक्षा अर्थात टायपिंग प्रमाणपत्र ‘जीसीसी’, ‘टीबीसी’च्या अर्हतेपेक्षा दहा मिनिटांत २५० शब्दांचा अवाढव्य उतारा दिला. आयोगाने ‘कीबोर्ड लेआऊट’, ‘आयएसएम’, ‘रेमिंग्टन’ मराठीचे सांगितले असतानाही ‘रेमिंग्टन गेल’ हा हिंदी ‘लेआऊट’ दिल्याची उमेदवारांची तक्रार आहे. दुसऱ्या चाचणीसंदर्भातही अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As the results of these mpsc exams are pending the anxiety of the students has increased dag 87 amy
Show comments