जगभर सुपरिचित असलेल्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी आशा बोथरा यांची निवड करण्यात आली आहे.गांधीवादी कार्यकर्त्यांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या सेवाग्राम आश्रमाचे दैनंदिन संचालन प्रतिष्ठान करीत असते. प्रथमच एक महिला या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे. आशा बोथरा या राजस्थान येथील मीरा संस्थानच्या संचालक आहेत. मावळते अध्यक्ष टी.एन.आर. प्रभू यांनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>‘आश्रमशाळा टू अमेरिका’; गडचिरोलीच्या भास्करचा प्रेरणादायी प्रवास; आदिवासी समाजातील व्यक्तीची वैज्ञानिकपदी निवड

पितृसंस्था असलेल्या सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल यांच्यावर नवा अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी हावडा येथे संपन्न बैठकीत सोपवण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी बैठक बोलावून नव्या अध्यक्षांची निवड केल्याचे अविनाश काकडे यांनी सांगितले. बोथरा दिल्ली येथील प्रतिष्ठित गांधी स्मारक निधीच्या गत पाच वर्षांपासून विश्वस्त असून सर्वोदय मंडळात सक्रिय आहेत. याचबरोबर, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या सचिवपदी प्रदीप खेळूरकर यांची निवड झाली आहे. आश्रमातील या परिवर्तनाचे देशभरातील गांधीवादी संस्थांनी स्वागत केल्याचे काकडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asha bothra as president of sevagram ashram foundation amy