वर्धा : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार हजार गट प्रवर्तक तसेच ७० हजार आशा सेविका १५ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना कंत्राटी कामगारांचा दर्जा द्या, अशी मुख्य मागणी आहे. त्यांच्यावर ऑनलाईन कामांसाठी दबाव आणला जातो. तो त्वरित थांबवावा. अशी कामे आशा वर्कर करणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांचे आजपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले.

बहुसंख्य आशा वर्कर अल्प शिक्षित आहेत, त्यामुळे इंग्रजीत असलेल्या अ‍ॅपवर काम करण्यास त्यांना अडचणीचे ठरते. ऑनलाईन कामाच्या दबावामुळे काही महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असे आयटक संघटनेचे दिलीप उटाणे निदर्शनास आणतात. विविध ५६ प्रकारची कामे हे कर्मचारी करीत असल्याने ऑनलाईन कामाचा त्यावर वाईट परिणाम होतो. ही अडचण लक्षात घेतल्या जात नाही. म्हणून या कामांसाठी संगणक चालक नियुक्त करावा. आयटक तसेच सिटू तर्फे हे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी दर्जा मिळेपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू वेतनश्रेणी मिळावी. वार्षिक पाच टक्के वेतनवाढ व पंधरा टक्के अनुभव बोनस मिळावा, अश्या व अन्य मागण्या आहेत.

हेही वाचा – नागपूरला फडणवीस, संघाचा बालेकिल्ला मानत नाही, सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले महाप्रबोधन यात्रेमागील खरे कारण

हेही वाचा – बुलडाणा : तलाठी अहिर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पटवारी संघाचे धरणे

शबाना शेख, विशाखा गणवीर, अरुणा खैरकर, शीतल लभाने, अश्विनी महकळकर, मंदा नाखले, जयश्री देशमुख, सोनम वानखेडे, सविता वाघ आदी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे.

Story img Loader