छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी (२ मार्च) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेत शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. पण ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली, ती म्हणजे सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दाडी मारली. नाना पटोले सभेला गैरहजर असल्याने चर्चेला उधाण आले होते. खासदार संजय राऊत यांनी नाना पटोलेंची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेर नाना पटोले यांनी या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण दिले. “मला दिल्लीत बोलावण्यात आले होते. दिल्लीत आमच्या सूरतच्या दौऱ्याचे नियोजन करायचे होते, म्हणून दिल्लीला होतो. माझी प्रकृती बरी नसल्याचे माध्यमांत सांगण्यात आले. पण, माझी प्रकृती चांगली आहे. माझ्यामुळे दुसऱ्याची प्रकृती खराब होते,” असे नाना पटोलेंनी म्हटले.

हेही वाचा : “राऊत, फाऊत, दाऊद जे असतील, यांना सांगतो…”, मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

यावरून आता काँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. “नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले आहे.

“महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन,” असे आशीष देशमुखांनी म्हटले आहे.

हेही वाचा : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून मारहाण, राजन विचारे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले…

“नागपूरला १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्याची कोणतीही जबाबदारी प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली नाही. आमच्या दुसऱ्या नेत्यांवर त्याची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीनगरच्या सभेत सूरतच्या मार्गावर असलेले प्रदेशाध्यक्ष १६ तारखेपर्यंत गुवाहाटीच्या मार्गावर असताना दिसतील,” असेही आशीष देशमुख म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh allegation congress leader nana patole over one khoka eknath shinde ssa
Show comments