नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून गृहमंत्रालयावर खोटा आरोप केला आहे. शरद पवार यांचा पक्ष जीर्ण झाला आहे, अशी टीका भाजप नेते, माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अनिल देशमुख आता मराठा आरक्षणाच्या आड जाऊन आरोप करीत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. ओबीसीत जे काही घटक आहेत, त्यातील कुणबींना अगोदरच आरक्षण आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, पण त्यासाठी वेगळा कोटा ठरवला पाहिजे. अजित पवार यांना अडचणीत आणायचे आणि सरकामधून काढून पुन्हा राष्ट्रवादीत आणायचे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे, असा गौप्यस्फोट आशिष देशमुख यांनी केला. सध्या अजित पवार यांना लक्ष्य करण्याचे काम शरद पवार करत आहे, असे या घडामोडीतून स्पष्ट दिसते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा… ‘‘डाळभाजी, पोळी, भात आणि ठेचा हा राष्ट्रीय मेन्यू आहे का?” कोणी उपस्थित केला प्रश्न, वाचा सविस्तर…

गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांना स्फोटके कोणी आणले, सचिन वाझे हा वसुली करतो हे कळले नव्हते? हे सर्व कटकारस्थान शरद पवार यांच्याकडूनच केले जात आहे. अनिल देशमुख यांची ‘नार्को टेस्ट’ करा, सत्य समोर येईल, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh criticizes anil deshmukh statement made on maratha reservation vmb 67 dvr
Show comments