नागपूर : कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार असल्याचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आशीष देशमुख उद्या रविवारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यानंतर श्रद्धा सबुरीने राजकीय वाटचाल असणार आहे. २००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपामध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती. नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार आहे, असे देशमुख म्हणाले.

हेही वाचा – अकोला जिल्ह्यात ५८७ एकर क्षेत्रावर गाळयुक्त शिवार; १८ कोटी ८० लाख लिटर जलसाठ्यात वाढ

काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत नाराजी आहे. अनेकांचा रोष प्रदेशाध्यक्षांबद्दल आहे. तो आता समोर आलेला पाहायला मिळत आहे. अजून काही काँग्रेसचे पदाधिकारी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षातून बाहेर पडतील. नाना पटोलेंबाबत अंतिम निकाल काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेतील, असेही ते म्हणाले.