नागपूर : काँग्रेस नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांना पक्षातून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी नगर येथील संयुक्त सभेला नाना पटोले अनुपस्थित होते. हे निमित्त साधून देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर कठोर टीका केली होती व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू

हेही वाचा – पर्यावरण मंजुऱ्यांच्या वेगात २१ पटीने वाढ; प्रकल्पांमुळे होणाऱ्या विनाशाबद्दल तज्ज्ञांना चिंता 

पटोले यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दर महिन्याला खोके मिळतात. त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करीत नाही. मात्र भाजपा नेत्यांवर टीका करतात, असा आरोप देशमुख यांनी केला होता. त्यापूर्वी राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, असेही म्हटले होते. देशमुख वरिष्ठ नेत्यांबद्दल वारंवार आरोप आणि टीका करतात. त्यांच्या माध्यमातील विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. याबाबत त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. तोपर्यंत माध्यमात वक्तव्य करू नये, असेही बजावण्यात आले आहे. कारणे दाखवा नोटीशीला तीन दिवसांत उत्तर न दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे. तोपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh suspended from congress criticized independent party leaders rbt 74 ssb
Show comments