लोकसत्ता टीम
नागपूर: डॉ. आशिष देशमुख यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला. मी कोणतीही निवडणूक लढणार नाही, असे देशमुख यांनी जाहीर केले.
काँग्रेसमधून निष्कासित केल्यानंतर देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अखेर रविवारी त्याला मूर्त रूप आले. ते सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढणार अशी होती. पण देशमुख यांनी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात ते निवडणूक लढणार नाही असे सांगितले. ते म्हणाले, ”मी आज सगळ्या लोकांसमोर जाहीर करतो की मी २०२४ ची कोणतीही निवडणूक लढणार नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षात काम करेल.