लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर कारधा येथील अशोक हायवेज लिमिटेडचा अशोका टोल नाका २८ सप्टेंबरच्या रात्रीपासून बंद करण्यात आलेला आहे. हा टोल नाका शासनाला हस्तांतरित करण्यात आला असून यापुढे या महामार्गाचे सहा पदरीकरण करण्यात येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-शेतकरी झाले निर्यातदार, राज्यातील पहिलेच असे पाऊल

अभिजित अशोका इनफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही अशोक कटारिया आणि मनोज व अभिषेक जयस्वाल यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. अशोक हायवेज लिमिटेडने बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा (बिओटी) तत्त्वावर या टोल नाक्याचे काम हाती घेतले. १९९८ साली कारधा येथे अशोक टोल नाक्याचे बांधकाम सुरू झाले होते. मात्र २००० साली या बांधकामाचा एक स्तंभ कोसळल्यानंतर पुन्हा या कामात अधिक कालावधी लागून २००१ मध्ये अशोका टोल नाका सुरू झाला होता. मुजबी ते सिंगोरी अशा ३२ कोटी आणि १० कोटी रिह्याबिटेशन अशा १३ किलोमीटर रस्ता आणि एक ब्रीज असे काम या कंपनीने केले आहे. २००१ पासून सुरू असलेल्या या टोल नाक्याला अखेर २८ सप्टेंबर २०१३ रोजी बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok toll gate at kardha closed after 13 years ksn 82 mrj