वर्धा : विधानसभा निवडणुकीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू सुमित वानखेडे यांच्या आर्वी मतदारसंघात घेतली. या सभेतील त्यांचे महिलांना लक्ष्य ठेवून केलेल्या भाषणाची चर्चा पण झाली. मात्र एका क्षणाची चांगलीच चर्चा होत आहे. फडणवीस हे स्टेजवर एक एक नेत्यास हात मिळवू लागले. सुमित वानखेडे यांनी वाकून त्यांना नमस्कार केल्यानंतर ते पोहचले दादाराव केचेंकडे. केचे यांचे हात काही वेळ हातात धरून ते जोरात हलविले. क्षणभर संवाद झाला. इतरांपेक्षा अधिक वेळ दादाराव यांना दिल्याने सर्वांच्या नजरा या भेटीवर खिळल्या. याबाबत विचारणा केल्यावर दादाराव यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. मात्र शेवटी ते म्हणाले की, म्हटल्याप्रमाणे होईल असे फडणवीस बोलले. त्यांनी काही शब्द दिला, त्या अनुषंगाने असेल, असेही केचे म्हणतात. कित्येक वर्षांपासून पक्षात काम करतोय. संबंध असतातच. त्यांच्या विनंतीस मान देत उमेदवारी अर्ज मागे घेतला, याची जाणीव ते ठेवून असतील. म्हणून बराच वेळ माझा हात त्यांनी पकडून आनंद व्यक्त केला असावा, अशी भावना केचे व्यक्त करतात.

विद्यमान आमदार असलेल्या दादाराव यांची उमेदवारी सुमित वानखेडे यांच्यासाठी कापल्यावर केचे यांनी संताप व्यक्त करीत अर्ज कायम ठेवला होता. मात्र नंतर अमित शहा यांच्या दरबारात केचे शांत झाले. अर्ज भरण्यापूर्वी तिकीट मिळणार नाही असे दिसून आल्यावर केचे यांनी समर्थकांचा मेळावा बोलाविला होता. तेव्हा फडणवीस यांनी त्यांना भेटीस बोलावून, मेळावा रद्द कर व तसा मेसेज मला वॉट्स अँप कर, असे सांगितल्याचे केचे म्हणाले होते. मेळावा रद्द झाला. पण तिकीट वानखेडे यांना घोषित झाल्यावर केचे अर्ज भरून मोकळे झाले. बेरकी राजकारणी अशी ओळख असलेले केचे हे दिलेल्या राजकीय पुनर्वसनाच्या हमीचा खुटा हलवून बळकट करीत असल्याची चर्चा पण झाली. झाले तसेच. कलूषित घडामोडीनंतर सोमवारी सायंकाळी प्रथमच फडणवीस – केचे आमने सामने आले. झालेल्या सभेत बोलतांना तरुण रक्ताला वाव देण्यासाठी केचे सहमत झाल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. सभा आटोपल्यावर त्यांनी परत केचे यांना कवटाळून आनंद व्यक्त केल्याचे केचे सांगतात. सांगितले तसे होईल, हे काय ते मात्र गुपित आहे. केचे यांना डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी देत निवडून आणण्याची खात्री देण्यात आली, अशी चर्चा होते. मात्र खुद्द दादाराव किंवा अन्य अधिकृत भाष्य करीत नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader