नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले. काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. येथील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे मतदान होताच नियोजन सुरू झाले आहे.

मतदानाचा टक्का वाढल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या आमदाराशी दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावरच सोपवण्यात आली आहे.

Eknath shinde devendra fadnavis 2
“आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra Assembly Election analysis by girish kuber
Video: “दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीच्या आमदारांची २०१९ च्या तुलनेत बेरीज वाढली तर…”, वाचा, गिरीश कुबेर यांचे विश्लेषण
sanjay-shirsat
Maharashtra Assembly Election 2024 Live: एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार; शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितले
AJit Pawar vs Yugendra Pawar in Maharashtra Baramati Constituency
Baramati Exit Poll Results 2024: यंदा बारामतीकर कुणाच्या बाजूने? मतदार म्हणतात, “दादाच येईल, पण…”
Two Young men harassed a girl in a bus girls abusing video viral on social media
“अशा मुलांना तिथेच फोडलं पाहिजे”, बसमध्ये भरगर्दीत तरुणांनी तरुणीबरोबर केलं लज्जास्पद कृत्य; VIDEO पाहून येईल संताप
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला
final time table for class 12th 10th examination has been announced by the state board Pune news
राज्य मंडळाकडून बारावी, दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर… लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा कधी सुरू होणार?

हेही वाचा…सोन्याच्या दरात मोठे बदल… सराफा व्यवसायिक म्हणतात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेचच ‘एक्झिट पोल्स’चे अंदाज यायला सुरुवात झाली. जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसते आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी ‘एक्झिट पोल्स’नी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यावरून काँग्रेस तयारीला लागले आहे.

हेही वाचा…राज्यभरातील कारागृहात तब्बल ७९ टक्के कच्चे कैदी; शासनावर वाढतोय आर्थिक भार

लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले असताना राज्य विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांनी संमिश्र अंदाज वर्तविले आहेत. काही संस्थांनी महायुती आणि महाविकास आघाडीत फार अंतर नसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रिंगणातील सहा पक्ष, छोटे पक्ष तसेच बंडखोरांमुळे नेमके चित्र स्पष्ट होत नाही. मात्र, काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. पण, भाजपची राजकारणाच्या शैली आता जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेस कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यासाठी आतापासून पावले टाकली जात आहेत. आमदारांना कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून आमदारांना सुरक्षित स्थळी तातडीने नेण्यासाठी विशेष विमान नागपुरात सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आहे.