गोंदिया : देशात आणि राज्यात महागाईने गाठलेला उच्चांक बघता वीस रुपयांच्या नोटेला आर्थिकदृष्ट्या फार महत्व नाही. पण, तरीही गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण क्षेत्रात या नोटचेे भाव वधारले आहेत. त्याला कारणही मोठे रंजक आहे. विधानसभा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती…. निवडणूक कोणतीही असो उमेदवाराकडून आपल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता नवनवीन क्लुप्ती शोधली जातेे. गोंदियातही असचा प्रकार घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया विधानसभेतील एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने आपल्या समर्थकामार्फत मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्याला मते मिळावी म्हणून २० रुपयाच्या नोट टोकन मनी म्हणून दिल्या आहेत. आता ही वीस रुपयांची नाेट घ्या, जिंकून आल्यास या वीस रुपयाच्या नोटच्या मोबदल्यात हजार रुपये न्या, असे आमिष दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणुकीत “कत्ल की रात्र” समजल्या जाणाऱ्या मतदानाच्या पूर्वसंध्येला गोंदिया विधानसभा मतदार संघातील ग्रामीण परिसरात अशाप्रकारे २० रुपयांचे नोट वाटण्यात आले.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्हा बँकेतील ३६० पदांच्या भरतीला पुन्हा स्थगिती; कारण…

चर्चेच्याच माध्यमातून यासंदर्भातील माहिती गोंदिया शहरातील मतदारापर्यंत पोहोचली. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच या २०च्या नोटच्या टोकनची चर्चा गोंदिया शहरात सुरू आहे. गोंदिया विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात गोंदिया विधानसभेत ८१ टक्के मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला. यानंतर गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण परिसरात मतदारांना दिलेल्या वीसच्या नोट चर्चा सुरू झाली. गोंदिया विधानसभेतील एका मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने आपल्या समर्थकामार्फत मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्याला मते मिळावी म्हणून २० रुपयांच्या नोटा टोकन मनी म्हणून वाटल्याची ही चर्चा आहे. आता ही वीस रुपयांची नाेट घ्या, जिंकून आल्यास तीच नोट दाखवा व तिच्या मोबदल्यात हजार रुपये न्या, असे आमिष मतदारंना दाखविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा…भाजप आमदार दादाराव केचेंवर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ? पण, केचे म्हणतात…

परंतु, ज्या उमेदवाराने हे आमिष दाखवले तो खरच आपला शब्द पाळणार का?असे आमिष दाखवणारा उमेदवारच पराभूत झाला तर हजार रुपये मिळणार कसे? निकालाच्या किती दिवसानंतर ही वीसची नोट दाखवल्यावर त्या मोबदल्यात मतदारंना हजार रुपये मिळतील? समजा उमेदवार निवडून आला आणि त्याला ही वीस रुपयाची नोट दिली. पण, त्याने त्या मोबदल्यात हजार रुपये देण्यास नकार दिला तर तक्रार करायची कुठे…, असे अनेक प्रश्न मतदारंच्या मनात निर्माण झाले आहेत. याची उत्तरे अद्याप सापडली नसली तरी वीसच्या बदल्यात हजार मिळणार याचा मात्र अनेकांना आनंंद झालेला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 gondia candidate offers voters twenty rupee note if he win take one thousand rupees in return sar 75 sud 02