नागपूर –पूर्वी कुठल्याही सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले, ती वयोवृद्ध महिला-पुरुष मतदारांचे मतदान करतानाचे छायाचित्र वर्तमान पत्रात प्रकाशित होत.वृद्धांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळीही कार्यरत असत. मात्र तरीही अनेक वयोवृद्धांना केंद्रापर्यंत जाणे शक्य नसल्याने ते मतदानाचा हक्क बजावत नसत. विशेषत: दुर्गम भागात तर ते मतदान करीतच नसत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता अशाच वृद्ध, तसेच दिव्यांग मतदारांसाठी ‘गृहमतदान’ म्हमजे घरीच मतदानाची सोय उपलब्ध करून दिली. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
उपक्रमाच स्वरुप काय ?
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४०टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने नागपूर जिल्ह्यात गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडली जात आहे.
हेही वाचा >>>राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन; विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय चर्चा…
गोपनियतेबाबत कोणती काळजी घेतली जाते ?
गृहमतदानाच्या गोपनियतेची आत्यंतिक दक्षता घेतली जाते गृहमतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येते. दोन अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक, व्हिडीओग्राफर, उमेदवारांचे अधिकृत मतदान प्रतिनिधी सोबत असतात. गृहमतदानाची पूर्वसूचना बीएलओमार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येते.. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची आत्यंतिक काळजी घेतली जाते. असे नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी सांगितले.
गृहमतदानाचे फायदे काय ?
गृहमतदानाच्या सुविधेमुळे जे वयोवृद्ध मतदार केद्रापर्यंत जाऊ शकत नाही व त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागते त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो. घरीच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येतो. त्याच प्रमामे दुर्गम भागातील वयोवृद्धांच्या घरीही निवडणूक शाखेचे अधिकारी जातात. व त्यांना मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करून देतात. नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेश सीमेलगतच्या रामटेक तालुक्यातील अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी याच उपक्रमांतर्गत गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला. यात कट्टा, सावरा, तुलारा, बेलदा या दुर्गम भागातील गावातील नऊ मतदारांचा समावेश होता. त्याच प्रमाणे दिव्यांग मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. केंद्रावर गेल्यावर त्यांना मतदान करण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने करताना अडचणी येतात. गृहमतदानामुळे निवडणूक कर्मचारी त्यांच्या घरीच पोहचत असल्याने त्यांना मतदान करणे सोयीचे होते.
हेही वाचा >>>सोयाबीनला सहा हजारांचा हमीभाव देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
मतदारांचा शोध कसा घेतला जातो ?
बीएलओमार्फत प्रत्येक वस्त्यावस्त्यांमधील वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांचा शोध घेतला जातो. ते मतदानास पात्र आहेत का याची खात्री करून घेतली जाते. त्यानंतर त्यांच्याकडून गृहमतदानासाठी संमती घेऊन तसा अर्ज भरून घेतला जातो. त्यांच्याघरी निवडणूक कर्मचारी येणार याची पूर्व सूचना मतदारांना दिली जाते त्यांच्या समतीनेच मतदान कर्मचाऱ्यांचे पथक घरी येते व मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते.
नागपूर जिल्ह्यात दिव्यांग, वृद्ध मतदारांची संख्या किती ?
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात .३ हजार ४३७ मतदार आहेत यात ग्रामीण मतदारसंघातील १ हजार ४१६ तर शहरी विधानसभा मतदारसंघातील २ हजार २१गृह मतदारांचा समावेश आहे.