चंद्रपूर : बाबरी मशीद जमीनदोस्त केल्यानंतर देशात धार्मिक दंगली उसळल्या, मुंबई बॉम्बस्फोट, गुजरात दंगल अशा घटनांमध्ये हजारो लोक मारल्या गेले. मृतदेहांच्या सोपानावर भाजप सत्तेत आला. जर्मनीत हिटलरने हुकूमशाही रूजवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भारतात हुकूमशाही रूजवत आहेत. संभाजी भिडे, धीरेंद्रकृष्ण महाराज, प्रदीप मिश्रा गावोगावी फिरून धर्मसंसद भरवून लोकांचे मेंदू बधिर करत आहेत. अशांना वेळीच वठणीवर आणा, अन्यथा आपल्या मुलाबाळांचे भविष्य अंधकारमय आहे, असे प्रतिपादन प्रा. श्याम मानव यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही चंद्रपूरकर या संस्थेच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर बोलताना प्रा. मानव यांनी मोदी सरकार, भाजपवर टीका केली. यावेळी मंचावर आमदार सुधाकर अडबाले, ॲड. गोविंद भेंडारकर, माजी आमदार देवराव भांडेकर, प्रवीण खोब्रागडे, हिराचंद बोरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र वैद्य, डॉ. अभिलाषा गावतुरे, उमाकांत धांंडे, दिलीप चौधरी, प्रदीप देशमुख, बळीराज धोटे, रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून संपूर्ण देशात फॅसिस्ट वातावरण तयार केले आहे. महात्मा गांधींच्या शरीरात सैतानाचा आत्मा घुसला होता असा वाईट प्रचार सनातन संस्था करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. संभाजी भिडे सारखा व्यक्ती महात्मा गांधी, शिवाजी महाराज यांच्या आईविषयी जाहीर सभेत अतिशय वाईट बोलतो. महात्मा गांधींवर टीका करणाऱ्या भिडे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस विधानसभेत गुरुजी पूजनीय आहेत असे म्हणतात. त्यामुळे मोदी व फडणवीस निर्माण करू पाहणाऱ्या संस्कृतीला घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे, असेही मानव म्हणाले. व्याख्यालाना हजारोंची गर्दी उसळली होती.

हेही वाचा >>>“फुलोंके रंगसे…” रंगबेरंगी फुलांचा बहर, कृषी विद्यापीठाच्या नयनरम्य फुलशेतीचे आकर्षण; शेकडो जातीची फुले वेधून घेताहेत लक्ष!

वैराग्यमूर्ती गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शाहू -फुले-आंबेडकरांचा आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवरायांच्या जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे. मात्र, धर्मसंसद व हिंदू धर्मगुरू अंधश्रद्धा वाढवण्याचे काम करत आहे, याला वेळीच आवरणे आवश्यक असून त्यांना वेळीच जागा दाखवण्याचे आवाहन प्रा. मानव यांनी केले.

समाज माध्यमातून प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न

महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची बांधणी केली. मात्र, भाजप समाज माध्यमातून त्यांची प्रतिमा मलीन करत आहे. दहा वर्षांपासून ईडी, सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे. देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर भाजपला दूर ठेवा, असे आवाहन प्रा. मानव यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assertion of prof shyam manav that it is the work of promoting superstition by the dharma sansad and hindu religious leaders rsj 74 amy