नागपूर : नामिबियन चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडल्यानंतर ‘ओबान’ आणि ‘आशा’ हे दोन्ही चित्ते गावाच्या सीमेजवळ फिरताना आढळले आहेत. मोकळ्या जंगलात सोडण्यात आलेल्या चार चित्त्यांपैकी या दोघांनी त्यांचा मोर्चा आता गावाकडे वळवला आहे.
‘ओबान’ आणि ‘आशा’ हे दोन्ही चित्ते दररोज सुमारे २५-३० किलोमीटरची भटकंती करत आहेत. ‘ओबान’ हा केव्हाच उद्यानाच्या बाहेर पडला आहे. मादी चित्ता ‘आशा’ कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतच, पण गावाच्या सीमेजवळ तीने भटकंतीची जागा निवडली आहे. ‘ओबान’ शिवपुरीच्या जंगलाकडे वळला असून त्याने काळविटाची शिकारदेखील केली.
हेही वाचा – महिला सरपंच, सदस्यांचा अनोखा फंडा; मालमत्ता कर भरा अन् वर्षभर मोफत दळण दळा
हेही वाचा – चंद्रपूर : भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
वनविभागाचे पथक त्यावर लक्ष ठेवून आहे आणि आता कुनोच्या व्यवस्थापनाने चित्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित ‘इलू’ नावाच्या श्वानाचीदेखील मदत घेतली आहे.