गेल्या महिन्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने २ कोटी ३८ लाख ५३ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.पावसाळ्यादरम्यानच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात फटका बसला होता. त्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. परंतु नेमके पीक कापणीला आले, त्याचवेळी अवकाळी पावसाने कहर केला आणि शेतकऱ्यांना हाताशी आलेला गहू, हरभरा गमवावा लागला होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन जिल्ह्याच्या १ हजार ३६९.५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. यामध्ये ११.९५ हेक्टर खरीप क्षेत्रही होते. त्यासाठी प्रशासनाने १ लाख १ हजार ५७५ रुपयांची मदत मागितली होती.

उशीरा पेरणी केलेल्या ३६ शेतकऱ्यांना फटका बसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात नमूद होते. याशिवाय २ हजार ४८० शेतकऱ्यांचे १ हजार २३५.१४ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिक नष्ट झाले असून १४७ शेतकऱ्यांच्या १२२.४३ हेक्टर क्षेत्रातील फळबागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसल्याचे अहवालात नमूद होते.

Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune district planning committee loksatta news
पुणे : वर्षात अडीच हजार कोटींची कामे, जिल्ह्यासाठी तेराशे कोटींसह ७५३ कोटींच्या अतिरिक्त निधीला ‘डीपीसी’मध्ये मंजुरी
pradhan mantri awas yojana, funds , private developers ,
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
Cracks appear in Butibori overbridge, closed for traffic
निकृष्ट बांधकामामुळे पूल खचला, गडकरींवर नामुष्कीची वेळ!, ‘एनएचआय’ने हात झटकले, आमदाराचे मौन

हेही वाचा >>>नागपूर:पक्षीमित्रांसाठी नवे मोबाईल ऍप , विद्यार्थ्यांसह संशोधकांना उपयुक्त

भाजीपाला व गहू-हरभऱ्यासह बागायती पिकांचे उत्पादन करणाऱ्यांच्या मदतीसाठी २ कोटी ९ लाख ९७ हजार ३८० तर फळपिकधारकांच्या मदतीसाठी २७ लाख ५४ हजार ६७५ रुपयांची मागणी करण्‍यात आली होती. अशाप्रकारे राज्य शासनाने तिन्ही वर्गवारीतील २ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ कोटी ३८ लाख ५३ हजार ६३० रुपयांच्या मदत रकमेची घोषणा केली आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात वळती केली जाणार आहे.नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी शासनाने यापूर्वीच महा-डीबीटीचे सूत्र अंगीकारले आहे. त्याच सूत्रानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्‍या खात्यात थेट राज्य शासनाकडून जमा केली जाणार आहे.

Story img Loader