गेल्या महिन्यात १४ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने २ कोटी ३८ लाख ५३ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.पावसाळ्यादरम्यानच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांना खरीप हंगामात फटका बसला होता. त्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. परंतु नेमके पीक कापणीला आले, त्याचवेळी अवकाळी पावसाने कहर केला आणि शेतकऱ्यांना हाताशी आलेला गहू, हरभरा गमवावा लागला होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन जिल्ह्याच्या १ हजार ३६९.५२ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाल्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता. यामध्ये ११.९५ हेक्टर खरीप क्षेत्रही होते. त्यासाठी प्रशासनाने १ लाख १ हजार ५७५ रुपयांची मदत मागितली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा