नागपूर : निसर्गाने भल्याभल्यांना आपल्या प्रेमात पाडले आहे, त्यातून निसर्गाचा घटक असणारा पक्षी कसा सुटणार! या निसर्गात वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळा आवाज काढून आकर्षित करणारे अनेक पक्षी आहेत, पण घुबडाच्या कुणी प्रेमात पडते हे अजूनतरी दिसून आले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्ध्यातील करुणाश्रमाने ही गोष्ट करून दाखवली आहे. या करुणाश्रमात कित्येक वन्यप्राण्यांना, जनावरांना, पक्ष्यांना आसरा मिळाला आहे. आपुलकी आणि प्रेम मिळाले आहे, मग या परिसरावर निसर्गाची कृपा होणार नाही तर काय! करुणाश्रम परिसर नैसर्गिक सौंर्याने नटलेला आहे. परिसरात वाढलेल्या वृक्षवल्ली टेकडी आणि गवत या जैवविविधतेने नटलेल्या परिसरात आज फोटोग्राफीची आवड असणारे महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांनाही फोटोग्राफीचा मोह आवरला नाही.

हेही वाचा – नागपूर : ५०० रुपयांची लाच घेताना वाहन निरीक्षकाला अटक

हेही वाचा – ‘एसटी’त अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांशी लाभाबाबत भेदभाव, महामंडळाच्या आदेशाला केराची टोपली

विविध पक्ष्यांचे छायाचित्रण करताना आकर्षक मुद्रा देणाऱ्या शृंगी घुबडाने त्यांना चांगलीच भुरळ घातली. किमान चार तास परिसर भ्रमण करून त्यांनी पक्षी निरीक्षण केले. शेवटच्या टप्प्यात वर्ध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर जुळले. या निसर्गभ्रमंतीत करुणाश्रमाचे आशीष गोस्वामी यांच्यासह ऋषीकेश गोडसे, तसेच पोलीस शिपाई गजानन देवकाते होते.