अकोला : नभोमंडपात ग्रह-तारकांचा अनोखा मेळा एकत्र बघता येणार आहे. विशेष म्हणजे आगामी ७ जानेवारीला सुमारे सात घटनांचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे. सोबतच २५ जानेवारीला सूर्यमालेतील सर्व ग्रह एका बाजूला येण्याची दुर्मिळ घटना आकाशप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी असेल, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या वर्षाच्या सुरुवातीला ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सूर्यमालेतील सात खगोल, सात राशी, नक्षत्र समूहातील सातव्या पुनर्वसू नक्षत्राचे, सात तारकांच्या सप्तर्षीचे उदय समयाला, सात बहिणींच्या व सात तारकांच्या कृत्तिका नक्षत्राच्या उपस्थितीत, सात चंद्र दर्शनाचा हा अनोखा सोहळा होणार आहे. सूर्यमालेतील सात ग्रह बघता येतील. यावेळी पृथ्वीवरुन पश्चिमेस शुक्राची तेजस्वी चांदणी २५ अंशावर, जरा वर शनी ग्रह ३५ अंशावर कुंभ राशीत, नंतरचा नेपच्यून ४७ अंशावर आणि आकाश मध्याशी अष्टमीचा अर्धा चंद्र ७५ अंशावर मीन राशीत, नंतर पूर्वेस वर युरेनस ७४ अंशावर मेषेत, त्याचे जवळचा ठळक गुरु ग्रह ५६ अंशावर वृषभ राशीत रोहिणी जवळ आणि पूर्व क्षितिजावर उदित लालसर मंगळ ग्रह कर्क राशीत असेल, असे दोड म्हणाले.

हेही वाचा – विकासाच्या नावाखाली अतिक्रमण, नागपुरातील काही उद्याने बंद, जागेवर व्यावसायिकांचा डोळा ?

सूर्य, चंद्र व ग्रह आकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या मार्गाला आयनिकवृत्त किंवा राशीचक्र म्हणतात. या बारा राशीतील पूर्व क्षितिजावर नुकतीच उदय पावणारी कर्क राशी, तिच्या वरची मिथुन, नंतरची वृषभ व पुढे मेष अश्विनीसह बघता येईल. या वेळी अष्टमीचा अर्धा चंद्र मीन राशीत व नंतर पश्चिमेस कुंभ राशी व मकर राशी मावळतीला असेल. पूर्व क्षितिजावर नक्षत्र समूहातील सातवे पुनर्वसू नक्षत्र ‘कॅस्टर’ व ‘पोलूक्स’ या दोन ताऱ्यांच्या स्वरूपात पाहता येईल, असे दोड यांनी सांगितले. येत्या २५ जानेवारीला सूर्यमालेतील सर्व ग्रह एका बाजूला येणार आहेत. यावेळी बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपच्यून हे सर्व ग्रह सूर्याभोवती फिरताना एकाच दिशेला असतील. ही घटना अतिशय दुर्मिळ व क्वचितच पाहायला मिळते. त्याचाही लाभ घेता येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा – विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ होणार,विद्यार्थ्यांवर भूर्दंडाची ही आहेत कारणे

दुर्बिणीतून बघता येणा रसहा चंद्र

रोज दिसणाऱ्या चंद्रासारखेच सात चंद्र बघता येणार आहे. त्यात चार चंद्र गुरू ग्रहाचे आणि शूक्र ग्रहाला अष्टमीच्या चंद्राप्रमाणे, तर बुध ग्रहाचा आकार एकादशीला दिसणाऱ्या चंद्रासारखा अनुभवता येईल. मात्र, नेहमी दिसणारा चंद्र सोडून बाकी सहा चंद्र दुर्बिणीतून बघता येतील, असे दोड यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astronomy news a rare event where all the planets in the solar system come to one side ppd 88 ssb