लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाच्या तीव्रतेने वाघ जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी पर्यटकांच्या गर्दीत वाघ मोहरली मुख्य रस्त्यावर सायंकाळी दिसून आला. वाघ रस्त्यावर असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबली होती.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-24-at-10.10.44-AM.mp4

देशातील सर्वाधिक वाघांचा जिल्हा अशी चंद्रपूरची सर्वदूर ओळख झाली आहे. आज घडीला २५० वाघ या जिल्ह्यात आहे. ताडोबा प्रकल्पात ९१ वाघ आहेत. त्यामुळे ताडोबा प्रकल्पाकडे पर्यटकांचा सर्वाधिक ओढा आहे. गत वर्षी अडीच लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी ताडोबा प्रकल्पाला भेट दिली. यावर्षीदेखील पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे.

हेही वाचा… कुठे आहे भारतातील एकमेव सीता मंदिर? काय होता शाप? का होते गर्दी जाणून घ्या..

रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी व दुपारच्या सफारीत पर्यटक ताडोबात गर्दी करून होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पर्यटक मोहरली मुख्य रस्त्याने जात असताना या मार्गावर एक पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाने पर्यटकांना दर्शन दिले. हा वाघ रस्ता पार करून जंगलात निघून गेला. वाघ रस्ता पार करीत असताना दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली होती. वाघ रस्ता पार करून जंगलात जात नाही तोवर पर्यटक रस्त्यावर होते. जंगलात वाघ गेल्यानंतर बराच वेळ पर्यटकांना दर्शन देत होता.

हेही वाचा… दातांची कीड, हिरड्यांचा आजार असलेल्यांना हृदयरोगाची जोखीम अधिक; नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील दंतशास्त्र विभागाचे निरीक्षण

वाघ रस्त्यावर आला तेव्हा पर्यटक राजेंद्र गर्गेलवार यांनी वाघाचे चित्रीकरण केले. सध्या वाघ मनसोक्त दर्शन देत असल्याने पर्यटकदेखील खुश झाले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At chandrapur tourists saw a tiger while passing through moharli road rsj 74 dvr
Show comments