यवतमाळ : शहरात किरकोळ वादातून सुरू असलेल्या खुनांचे सत्र कायम असून सोमवारी सायंकाळी वर्दळीचा दत्त चौक खुनाच्या घटनेने हादरला. अनेक नागरिक, लहान मुले, महिलांसमोर आरोपींनी तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याला जागीच ठार केले. सुजल कैथवास (२२), रा. इंदिरानगर, भोसा नाका असे मृताचे नाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दत्त चौकात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन टाळक्यामध्य वाद सुरू हाता. यात तुंबळ हाणामारी झाली. मार खाणाऱ्या गटातील दोघांनी धारदार चाकू काढून प्रति हल्ला चढविला. त्यामध्ये एक युवक त्यांच्या हाती लागला.त्याच्यावर चाकूचे सपासप वार करून त्याला जागीच ठार केले. हा सर्व थरार दत्त चौक परिसरात वर्दळीच्या वेळी घडला. मारेकऱ्यापैकी एकाने जमावाकडे पाहत ‘भाईगिरी करोंगे तो ऐसेही मरोगे’, असे म्हणत पळ काढला. सुजलचा खून कोणी व का केला याचे कारण उशिरापर्यंत कळले नाही. या खुनाच्या घटनेचे अनेक जण प्रत्यक्षदर्शी आहेत.
हेही वाचा >>>विधान परिषद निवडणुकीत मराठा आमदार ओबीसीं उमेदवारांना मतदान करतील ?
दत्त चौकातील ऑटो पॉइंटजवळ सोमवारी सायंकाळी दोन टोळक्यांमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. या वादात अचानक मारामारी सुरू झाली. मारहाणीत भारी पडलेल्या गटाला प्रतिहल्ला करीत जबाब देण्यासाठी मार खाणाऱ्या गटातील तिघांनी धारदार चाकू काढून हल्ला चढवला. शस्त्र पाहताच मारणाऱ्या गटातील सदस्यांची पळापळ झाली. याच झटापटीत सुजल मारेकऱ्यांच्या हाती लागला. त्याला एकाने कापड दुकानाजवळ पकडून ठेवत दुसऱ्याने चाकूने सपासप वार केले. हा थरार असंख्य लोक पहात होते. हल्ला करणाऱ्यांपैकीच एकाने राहू दे हणत तेथून साथीदाराला घेऊन पळ काढला. यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. दत्त चौकात ऑटो पॉइंटजवळ या टोळक्यांमध्ये वाद सुरू असताना त्यांना कोणीही हटकले नाही. या टोळक्याला वेळीच हटकले असते तर, ही घटना टळली असती, अशी चर्चा आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अवधुतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
खुन केल्यानंतर हल्लेखोर दत्त चौकातीलच एका वाईनबारमध्ये पोहोचले. तेथून ते कारमध्ये बसून पसार झाले. परिसरातील दुकानांपुढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. घटनेनंतर पोलिसांनी मारेकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी हे फुटेज तपासणीची मोहीम हाती घेतली. हाणामारीचा घटनाक्रम कृषी केंद्राबाहैर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यावरून आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी शोधाशोध करून रात्री उशिरा यातील संशयित आरोपी यश पवार याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा संशयितसुद्धा जखमी अवस्थेत आहे.
हेही वाचा >>>पुरावा नसतानाही अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांनी…
दत्त चौक ते दाते कॉलेज मार्गावर नालीचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे येथे बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. याच ठिकाणी खुनाचा हा थरार घडला. त्यामुळ येथे वाहतुकीची कोंडी होऊन मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळावर झटापट झाल्याने आरोपीच्या चपला रस्त्यावर पडल्या हात्या. हल्लेखोरांनी चाकूची मॅन तेथेच फेकून दिली होती. एकाचा गॉगलही रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना घटनास्थळी एक मोपेड व एक मोटारसायकल अशी दोन संशयित वाहने जप्त केली. त्यावरून आरोपीचा माग काढला जात आहे. मृत व जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे नातेवाइकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. चालू वर्षी सहा महिन्यात जिल्ह्यात खुनाच्या ३२ घटना घडल्या आहेत. वैयक्तीक वादासह भाईगिरीतील वर्चस्व, अनैतिक संबंध आदी कारणाने खून झाले आहेत.