वर्धा जिल्ह्यातील बहुतांश पक्ष नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहले.तेव्हा मौन ठेवून असलेले माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आता जाहीर भूमिका घेत अजित पवार यांच्या गोटात जाणे पसंत केले आहे.
हेही वाचा… पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर
काल शुक्रवारी त्यांनी मुंबईत अजितदादांची भेट घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. विदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने ते सुटण्यासाठी अजित पवार हेच सक्षम ठरतात. त्यांच्या मागे विदर्भातील ताकद उभी करू. राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष करणार, अशी हमी मोहिते यांनी पवारांना दिली.अजित पवार हे विदर्भात लवकरच दौरा करणार असल्याची माहिती पण त्यांनी दिली.