लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला : नववर्ष २०२४ मध्ये आकाशात विविध घडामोडी अनुभवता येतील. मनमोहक खगोलीय घटनांचा मनसोक्त आनंद घेण्याची पर्वणी खगोलप्रेमींसाठी वर्षभरात वारंवार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

नववर्षाच्या प्रारंभीच ३ जानेवारीला उपसूर्य स्थितीत आल्याने पृथ्वीपासून सूर्य सर्वात कमी अंतरावर अर्थात १४ कोटी ७० लाख किलोमीटर असेल. या वर्षात सूर्य व चंद्र यांची प्रत्येकी दोन दोन ग्रहणे आहेत. २५ मार्च व १८ सप्टेंबर होणारे चंद्रग्रहण बघता येईल. ८ एप्रिल आणि ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा आनंद शक्य नसेल. पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र ज्या पौर्णिमेला कमी अंतरावर असतो, त्यावेळी चंद्र आकाराने मोठा व अधिक प्रकाशमान दिसतो. त्याला ‘सूपरमून’ म्हटले जाते. या वर्षात १९ ऑगरस्ट, १८ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर व १६ नोव्हेंबरला त्याचा अनुभव घेता येईल. निरभ्र आकाशात क्षणार्धात चमकून जाणारी विविधरंगी प्रकाशरेखा उल्का बेभरवशाची राहील. तरीही अकस्मात प्रकाशणारी रेषा मात्र खूपच छान दिसत असते. तसे मनोहरी प्रसंग ४ जानेवारी, २२ एप्रिल, ५ मे, २८ जुलै, १२ऑगस्ट, २१ ऑक्टोबर, ५ आणि १२ नोव्हेंबर तसेच १४ व २२ डिसेंबर या कालावधीत बघता येतील, असे दोड म्हणाले.

आणखी वाचा-जेष्ठांवरील अत्याचारांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी; मध्य प्रदेशात सर्वाधिक गुन्हे

पृथ्वीच्या वातावरणातील बदल घडवून आणण्यासाठी वर्षातील चार दिवस महत्त्वाचे असतात. त्यात २० मार्च व २२ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य नेमका पृथ्वीच्या विषुववृत्तावर, तर २१ जून व २१ डिसेंबर रोजी सूर्य नेमका कर्क वा मकरवृत्तावर येईल. दरमहा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करताना चंद्र आकाशातील प्रत्येक ग्रहापासून जेव्हा अधिक जवळ येतो, त्याला युती म्हणतात. या प्रकारे एकापेक्षा अधिक ग्रह एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर तो आकाश नजारा खूप सुंदर दिसतो. २७ जानेवारीला बुध व मंगळ ग्रह, २२ फेब्रुवारीला शूक्र आणि मंगळ, २८ फेब्रुवारी रोजी बुध व शनी, २२ मार्च शनी आणि शूक्र, ११ एप्रिल मंगळ व शनी, १९ एप्रिलला बुध व शूक्र, २१ एप्रिल गुरु व युरेनस, २३ मे रोजी गुरु व शूक्र, ३१ मेला बुध व युरेनस, ४ जुन बुध व गुरु, १७ जून बुध व शूक्र, १५ जूलै मंगळ व युरेनस, ७ऑगस्ट बुध व गुरु, १४ ऑगस्टला मंगळ व गुरु ग्रह अशा प्रकारे जोड ग्रहांचे दर्शन घेता येईल.

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राचेही दर्शन

दूर्बिणीतून अत्यंत सुंदर दिसणारी शनी ग्रहाची कडी एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत सरळ रेषेत आल्याने कड्यांचा आकार कमी प्रमाणात दिसेल. सोबतच आपल्या पृथ्वीला सुमारे चारशे किलोमीटर अंतरावरून प्रदक्षिणा केवळ दीड तासात पूर्ण करताना आपल्या भागात आल्यावर आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र बघता येईल. त्याचा आनंद ९ जानेवारीला सकाळी व संध्याकाळी दोनदा घेता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.