वर्धा : शहरातील भटक्या श्वानांच्या त्रासाची चर्चा होते. पण ग्रामीण भाग या कुत्र्यांनी किती त्रस्त आहे याची दखलही घेतल्या जात नाही. अशी एक चटका लावणारी घटना पुढे आली आहे.
करंजी येथील डॉ. प्रकाश नागपुरे यांच्या शेतात गुरांसाठी कोठा बांधण्यात आला आहे. रात्री बाराच्या सुमारास सहा श्वानांच्या टोळीने त्या ठिकाणी हल्ला केला. गाईच्या कालवडीचे लचके तोडले. त्यात तिचा मृत्यू झाला. यावेळी शेतातील काहींनी आरडाओरड केली. ते त्यावेळी गाडीवर असल्याने स्वतः मदत करू शकले नाही, पण गोंधळ झाल्याने श्वान पळून गेले. पण जाता जाता ते फडशा पाडून गेले.
हेही वाचा – गोवंश तस्करी; बाहेरून कुलर आत जनावरे कोंबलेली
या भटक्या कुत्र्यांचे करायचे काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. शहरात ज्या प्रकारे बेवारस कुत्र्यांचे नियोजन होते, तसे गावात उपाय का होत नाही? असा सवाल केला जात आहे