लोकसत्‍ता टीम

अमरावती : धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.

BJP benefits from governments decision workers will become SPOs
सरकारच्या ‘या’ निर्णयाचा भाजपला फायदा, कार्यकर्ते होणार ‘एसपीओ’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Will AAP win Delhi Assembly elections 2025 for fourth time or BJP will get chance after 31 years
‘आप’ चौथ्यांदा, की… भाजपला ३१ वर्षांनी संधी?
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
BJP member registration deadline has passed but not even half of target has been met
भाजप सदस्य नोंदणी! ‘तारीख पे तारीख’ सदस्य जुळता जुळेना
Congress leader Ravindra Dhangekar
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर ?
Like Congress BJP in district faces factionalism highlighted during Guardian Minister Ashok Uikes first tour
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपमधील गटबाजी उघड
Delhi Assembly Elections BJP Third Manifesto
भाजपचा तिसरा जाहीरनामा; तीन वर्षांत यमुना स्वच्छ करण्याचे आश्वासन

सोमवारी रात्री अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परत येत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्‍लेखोरांनी त्‍यांची एमएच २७ / डीबी ५००१ क्रमांकाची कार अडवली आणि अचानकपणे अर्चना रोठे यांच्‍यावर चाकूहल्‍ला केला. त्‍यांच्‍या कारच्‍या समोरील काच फोडण्‍याचाही प्रयत्‍न हल्‍लेखोरांनी केला. या घटनेनंतर हल्‍लेखोर अंधारात पसार झाल्‍याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आणखी वाचा-Anil Deshmukh Injured: अनिल देशमुख यांच्या हल्ल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, “घटनेमागील तथ्य…”

हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍या मानेवर वार करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, त्‍यांनी मानेवरचा वार हातावर घेतल्‍याने त्‍यांच्‍या हाताची नस कापली गेली. जखमी अवस्‍थेत अर्चना रोठे यांना डॉ. ढोले यांच्‍या रुग्‍णालयात आणण्‍यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्‍यांना अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. या प्रकरणी चांदूर रेल्‍वे पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. यावेळी कार्यकर्त्‍यांनी पोलीस ठाण्‍यासमोर गर्दी केली होती.

निवडणूक प्रचार आटोपल्‍यानंतर हा हल्‍ला झाल्‍याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेमुळे कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये. प्रत्येकाने आपले गाव सोडून इतर कुठेही जाऊ नये. हा संपूर्ण प्रकार आपण गोंधळ घालावा यासाठी विरोधकांनी रचलेला कट असू शकतो, अशी शंका प्रताप अडसड यांनी व्यक्त केली. सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातच शांत राहावे आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्या मतदारांना बाहेर काढावे, असे आवाहन देखील प्रताप अडसड यांनी केले.

आणखी वाचा-औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला – फडणवीस

अर्चना रोठे यांच्या वाहनावर दगडफेक करणारे आणि त्यांच्या हातावर चाकून वार करणारे हल्लेखोर हे अज्ञात असून, या घटनेनंतर हल्लेखोरांनी रात्रीच्या अंधारात पळ काढला. चांदूर रेल्वे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्याआधी सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदासंघात जोरदार प्रचार केला. दरम्यान, प्रचार संपताच हा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अर्चना रोठे या ज्‍येष्‍ठ भाजप नेते अरूण अडसड यांच्‍या कन्‍या आहेत. त्‍यांनी प्रताप अडसड यांच्‍या प्रचाराची धुरा सांभाळली होती. गेल्‍या निवडणुकीत प्रताप अडसड हे भाजपच्‍या उमेदवारीवर निवडून आले होते.

Story img Loader