अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान अपक्ष उमेदवार विकेश गोकुलराव गवाले (३१) यांच्‍यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. पाठिंबा देण्‍याच्‍या मागणीसाठी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

सोमवारी प्रचारासाठी मोर्शीकडे जात असताना माहुली जहागीर नजीक त्यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवला. यामध्ये विकेश गवाले किरकोळ जखमी झाले आहेत. विकेश गवाले यांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत वाहनाने माहुली जहागीर गाठले. तेथील काही नागरिकांनी त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेनंतर त्‍यांच्‍या नातेवाईकांनी रुग्णालयावर धडक देत घटनेचा निषेध केला. विकेश यांना मारहाण करणारे नेमके कोण होते, हे कळू शकले नाही.

maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा…
st mahamandal employees
एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…
akola Yogi Adityanath look alike
अकोला : प्रचारासाठी ‘योगी आदित्यनाथां’ची चक्क जेसीबीतून मिरवणूक? भाजप उमेदवाराच्या ‘आयडिया’ची चर्चा
tejas Thackeray
माजी मुख्‍यमंत्र्यांचे चिरंजीव चक्क सामान्‍यांच्‍या खुर्चीत! वलगावातील सभेत…
uddhav Thackeray
“राज्‍यात तीन भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ…”, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका
cm eknath shinde
“हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

हेही वाचा – नागपूर : धक्कादायक! श्वान आवडत नाही म्हणून थेट विषप्रयोग

विकेश गवाले हे अमरावती येथील खासगी बँकेत नोकरीला आहेत. रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे ते वास्तव्यास आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सोमवारी दुपारी ते क्र. एम.एच.२७ डी.ई. ६३९१ चारचाकी वाहनाने मोर्शी येथे प्रचारासाठी जात होते. यावेळी त्यांना माहुली जहागीरपुढे रेल्वे पुलाजवळ चार अज्ञात इसमांनी हात दाखवून वाहन थांबवले. यावेळी पाठिंबा देण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातील एकाने विकेश गवाले यांना मारहाण करायला सुरुवात केली.

हेही वाचा – काँग्रेस उमेदवाराच्या मेळाव्याकडे काँग्रेस नेत्यांचीच पाठ

गवाले यांनी तातडीने वाहन सुरू करून घटनास्थळावरून पळ काढला. जीव वाचवत वाहन माहुलीच्या दिशेने वळवले. माहुलीच्या बस थांब्‍यावर येताच त्यांनी नागरिकांना घटनाक्रम सांगितला. नागरिकांनी लगेच त्यांना माहुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती माहुली जहागीर पोलिसांना देण्यात आली, मात्र पोलीस तासभर घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहचले नसल्याने नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.