लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : रेल्वे स्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांवर एका माथेफिरूने हल्ला केला, यात दोघे ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली.

नागपूरमध्ये प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पाच जणांवर माथेफिरून हल्ला केला असून यात दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर आणि किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील माथेफिरू आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमींना इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा-हवामान खात्याकडून पावसाचा इशारा, पण आकाशात मात्र सूर्याचा…

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ वर झोपलेल्या पाच जणांवर एकाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाला सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकात पहाटे सव्वा तीन वाजता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपी उत्तर प्रदेशचा राहणार असून जयराम केवत असे त्याचे नाव आहे. त्याने लाकडाच्या दांड्याने झोपलेल्या प्रवाशांना अचानक मारायला सुरुवात केली. दोघांच्या डोक्याला मारल्याने रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-नितीन गडकरी म्हणाले “मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास…”

दरम्यान, रेल्वेमध्ये एका वृध्द व्यक्तीला गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना समोर आली होती. नाशिकमध्ये एका ट्रेनमध्ये ४-५ तरूण गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेत एका वृद्धाला मारहाण करत असल्याचा संतापजन प्रकार घडला होता. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. ७२ वर्षीय वृद्ध गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यामुळे सहप्रवाशांनी वृद्धाला मारहाण केली, ही घटना २८ ऑगस्टला घडली होती. या प्रकरणाची दखल पोलिसांनी देखील घेतली. यासंदर्भात व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्या तरूणांना अटक केली. त्यांना लगेच जामीन मिळाला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on passengers at nagpur railway station two killed and two injured rbt 74 mrj