नागपूर: अहमदनगर जिल्ह्यातील राहता परिसरातील पिंपरीनिर्मळ या गावातील दोन दलित कुटुंबांवर एका समाजातील ४००-५०० जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यावर बोट ठेवत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु कुणालाही अटक नसल्याचे सांगत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बुलढाणा : चाळीस हजारांची लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

हेही वाचा – अमरावती : उत्पादन घट तरीही सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

भुजबळ म्हणाले, या दोन दलित कुटुंबांच्या घराची जमावाने नासधूस केली. लहान मुलीनांही मारहाण केली. या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा ७१ जणांवर दाखल झाला. परंतु, एकाही आरोपीला अटक केलेली नाही. हे योग्य नाही. आरोपी कुणीही असो, कितीही मोठा असो आणि कुठल्याही समाजाचा, राजकीय पक्षांचा असो, त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केली. निवडणुकीत गावातील नेत्यांनी सांगितलेल्या व्यक्तीला मतदान केले नाही, म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचेही भुजबळ म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on two dalit families in pimpari nirmal village of ahmednagar district chhagan bhujbal expressed his displeasure with the police mnb 82 ssb
Show comments