वर्धा : बजाज वाचनालय सभागृहात आयोजित सभेसाठी संभाजी भिडे आले असताना त्यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, निर्माण, भारतीय बौद्ध महासभा व अन्य संघटनांनी आज केला.

त्यांचे आगमन वर्धेत होत असल्याचे कळल्यावर निषेध म्हणून संघटना कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करीत भिडेंचा निषेध नोंदविला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे चिडून काहींनी सभास्थानी धाव घेत निषेधाच्या घोषणा दिल्या.

हेही वाचा – बुलढाणा : वसतिगृहातील विद्यार्थ्याकडे अग्निशस्त्र! कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त; पोलीसही चक्रावले

आघाडीचे विदर्भ समन्वयक किशोर खैरकार म्हणाले, की दंगल घडविणाऱ्या भिडे यांच्या सभेमुळे वर्ध्यात दंगल घडल्यास जबाबदार कोण राहणार. जिल्ह्यात शांतीचे वातावरण आहे. पण या सभेने जनतेत भीतीचे सावट निर्माण होणार म्हणून भिडे सारख्यांना जिल्ह्यात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी नीरज गुजर,आशिष सोनटक्के, विशाल मानकर, विशाल शेंडे, नितीन इंदुरकर, मनोज कांबळे, सतीश इंगळे, बंटी रंगारी आदींनी केली. या घटनेने थोडा तणाव निर्माण झाला होता. मात्र सभा सुरळीत पार पाडल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.

Story img Loader