नागपूर : दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीच्या जीवनात तिसऱ्याचा प्रवेश झाला. तरुणीने दोघांनाही लग्नाचे आमिष दाखवले. दोघांकडून महागड्या भेटवस्तू घेतल्या. प्रेयसीच्या अनैतिक संबंधाबाबत कळल्यानंतर पहिल्या प्रियकराने प्रेयसीला भेट दिलेला मोबाईल परत मागितला. त्यामुळे चिडलेल्या तरुणीच्या दुसऱ्या प्रियकराने युवकाचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. प्रेमाच्या त्रिकोणातून ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता हुडकेश्वरमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मिका (२४, काल्पनिक नाव) ही आरोपी नेहाल (३५) याची नातेवाईक असून त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, रश्मिकाचे लग्न नेहालच्या नातेवाईक युवकासोबत झाले. त्यामुळे दोघांचे प्रेमसंबंध संपुष्ठात येण्याऐवजी पुन्हा बहरले. नात्यातच लग्न झाल्याने दोघांचेही अनैतिक संबंधाबाबत कुणालाही कुणकुण लागली नाही. नेहालनेही कुटुंबीयांच्या सांगण्यावरून लग्न केले. मात्र, काही दिवसांतच त्याने पत्नीशी वाद घालून माहेरी पाठवले. रश्मिका आणि नेहालचे प्रेमसंबंध वाढल्यानंतर तिच्या पतीला अनैतिक संबंधाबाबत संशय आला. ‘नको त्या अवस्थेत’ बघितल्यानंतर त्याने पत्नी रश्मिकाला घरातून बाहेर काढले. त्यानंतरही नेहाल आणि रश्मिकाचे प्रेमसंबंध कायम होते.

Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
young man killed with cement block in Kondhwa after drinking argument on Monday
दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून, कोंढव्यातील घटना
Nagpur murder, Murder of a youth, revenge ,
उपराजधानीत तीन दिवसांत तिसरे हत्याकांड; मित्राच्या खुनाचा बदला घेत युवकाचा खून
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
Ghatkopar West, two were attacked , bamboo ,
मुंबई : किरकोळ वादातून बांबूने मारहाण करून खून, एक जखमी
Daring robbery in Dabhadi woman killed in scuffle
दाभाडीमध्ये धाडसी दरोडा, झटापटीत महिला ठार

हेही वाचा – चंद्रपूर : ५५ वाघांना बेशुद्ध करून जेरबंद करणाऱ्या डॉक्टर व चमूबद्दल जाणून घ्या..

माहेरी राहणाऱ्या रश्मिकाची ओळख स्वत:चे गॅरेज असलेल्या सचिन महंत (३०, तरोडी, वाठोडा) याच्याशी झाली. गेल्या दोन वर्षांपासून दोघांचे सूत जुळले. रश्मिकाच्या प्रेमात वेडा झालेला सचिन लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. तिला महागड्या भेटवस्तू आणि कपडे घेऊन देत होता. सचिन तिला भेटायला गेल्यानंतर नेहाल हा तिच्या घरात झोपलेला त्याला दिसला. त्याच्या प्रकार लक्षात आल्याने तो रागारागात निघून गेला. त्याने रश्मिकाला प्रेमसंबंध संपल्याचे सांगून भेट दिलेला महागडा मोबाईल परत मागितला. तिने प्रियकर नेहालला सचिनचा काटा काढण्याबाबत सांगितले. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता नेहालने सचिनला दिघोरी चौकात गाठले आणि त्याच्यावर चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी धाव घेतल्यामुळे सचिन थोडक्यात वाचला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून नेहालला अटक केली.

Story img Loader