लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सना खान यांच्या अश्लील चित्रफिती आणि हत्याकांड प्रकरणात शहरातील काही भाजप नेत्यांची नावे समोर येत असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

सना खान यांच्याशी नागपुरातील भाजपच्या काही नेत्यांचे संबंध होते, अशी माहिती समोर येत आहे. सना खान यांच्यासोबतच्या आंतरिक क्षणाच्या चित्रफिती तयार करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाल्यानंतर भाजपच्या गोटात मोठी तारांबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावात हे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर: खेडी शेतशिवारात चार वाघांचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये दहशत

सना खान यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांना शिक्षा होणे अडचणीचे ठरणार आहे. सना खान यांच्याशी अश्लील कृती करतानाच्या राजकीय नेत्यांच्या चित्रफिती अमितकडे आहेत. त्यामुळे अमित जामिनावर सुटल्यावर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो, ही भीती पक्षाला अस्वस्थ करीत असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व आरोपी कारागृहात

या हत्याकांडाचा सूत्रधार अमित शाहू आणि जितेंद्र गौड, धर्मेंद्र यादव, राकेश सिंह, कमलेश पटेल आणि रब्बू ऊर्फ रविकिशन यादव यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. आरोपींनी सना यांचा मृतदेहाचे नेमके काय केले, याबाबत उलगडा करण्यात मानकापूर पोलिसांना अपयश आले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-नागपुरात लवकरच ‘प्रादेशिक नेत्र इन्स्टिट्यूट’, वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

नागपुरातील अनेक भाजप नेत्यांचा संबंध – वडेट्टीवार

सना खान प्रकरणात नागपुरातील भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांचा हात असल्याने निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली केंद्र व राज्य सरकारने चौकशी करावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणात काँग्रेसचे जबलपूरचे आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी उघडपणे तर भाजपच्या नेत्यांना गुप्तपणे बोलवले जात आहे. या प्रकरणात राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधित अनेक नावे आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to suppress sana khan murder police are confused as the names of bjp leaders have surfaced adk 83 mrj
Show comments