लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे आज अभूतपूर्व आणि थरारक घटना घडली. एका इसमाने मोबाईल टॉवरवर चढून गळफास लावला अन् थेट खाली उडी घेतली. सुदैवाने यातून तो बचावला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रमेश रामभाऊ सरकटे (५२, रा. हिवरा आश्रम) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

आणखी वाचा-सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रमेश सरकटे उंच टावरवर चढले. यानंतर त्यांनी गळफास लावून घेत वरून उडी मारली. सुदैवाने ते अडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत. काही नागरिकांनी त्यांना टॉवरवर चढताना बघितले होते. त्यामुळे धाडस आणि प्रसंगावधान राखत काही व्यक्ती टॉवरवर चढले. तोपर्यंत रमेश सरकटे टॉवरवरून उडी घेत वरतीच लटकले होते. सचिन गवई यांनी ताबडतोब ‘१०८’ डायल करून रूग्नवाहिका बोलावून घेतली. ‘इमर्जन्सी असिस्टंट’ संदीप पागोरे, डॉ. पिसे यांनी नातेवाईकांच्या सांगण्यावरून रमेश सरकटे यांना मेहकर येथील डॉ. फिस्के यांच्या रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण समजू शकले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempted suicide by hanging on mobile tower man injured scm 61 mrj