शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासह कलेचा वारसा लाभला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने स्वच्छ व सुंदर नागपूर करण्यासाठी शहरातील विविध भागातील भिंतीवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात येत आहे. एकीकडे शहर सौंदर्यीकरण केले जात असताना दुसरीकडे सुशोभित केलेल्या भिंतीची योग्य निगा राखली जात नसल्याने रेखाटलेली चित्रे पुन्हा धुळीने व कचऱ्याने माखली जात असल्याने चित्रकारांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मराठी नाटय़ परिषदेत ‘सभासद नाटय़’!, निवडणूक जिंकण्यासाठी खोटे अर्ज भरल्याची तक्रार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि जी-२० परिषदेची बैठक यानिमित्ताने महापालिकेने शहरातील शासकीय व निमशासकीयसह विविध दर्शनीय भागातील इमारतीच्या संरक्षक भिंतीवर भित्तिचित्रे रेखाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत चित्रकला महाविद्यालयासह शहरातील अनेक नवोदित आणि प्रस्थापित चित्रकार सहभागी झाले होते. आपल्या कल्पनाशक्तीतून त्यांनी पदपथालगतच्या संरक्षक भिंतींवर विविध विषयानुरूप चित्र रेखाटली. या चित्रांमधून नागूपरचा समृद्ध वारसा झळकतो. मात्र, ज्या भागातील भिंतीवर चित्रे रेखाटण्यात आली त्या भिंती लगतच फुटकळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. अनेक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने रंगवलेल्या भिंती खराब होत असल्याचे चित्र आहे.

सक्करदरा येथील आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाला लागून असलेल्या भिंतीवर आयुर्वेदसंबंधी आकर्षक चित्र रेखाटली मात्र त्या भिंतीला लागून छोट्या दुकानदारांनी दुकाने थाटली त्यामुळे चित्र दिसेनासी झाली आहेत. याच ठिकाणी रंगवलेल्या भिंतीला लागून कचराघर तयार करण्यात आले आहे. चित्रकला महाविद्यालयाला लागून असलेल्या भिंतीजवळ कचराघर असून तेथील रंग खराब झाले आहे. सक्करदरा येथील पुलाच्या भिंत व पिल्लरवर संगीत या विषयावर अतिशय सुरेख चित्र रेखाटली आल्त. मात्र, त्या भिंती आणि परिसर रस्त्यावरील भिकारी घाण करुन ठेवतात. त्यांना तेथून हटवले जात नाही. ईश्वर देशमुख महाविद्यालय ते तुकडोजी महाराज पुतळा या मार्गावरील फुटपाथला लागून भिंतीवर आकर्षक चित्रे रेखटण्यात आली आहे मात्र, तिथे सुद्धा कचराघर आणि छोट्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. याशिवाय मेडिकल चौक, वंजारीनगर पाण्याची टाकीजवळच्या नवीन पुलाच्या दोन्ही बाजू, म्हाळगी नगर, मनपा शाळेची भिंत, मानेवाडा, अजनी पोलीस ठाणे, सक्करदरा लेन, चित्रकला महाविद्यालय, नीरीची भिंत, मोक्षधाम घाट, लक्ष्मीनगर पाण्याची टाकी, पंचवटी वृद्धाश्रम, मोठा ताजबाग, सीए रोड गांधीबाग, महाल, रमण विज्ञान केंद्राची भिंत, गायत्री मंदिरची भिंत जगनाडे चौक, कॉटन मार्केट रेल्वेस्थानकजवळ, मेहंदीबाग कॉलोनी, राणी दुर्गावती चौक, झिरो माईल चौक, विवेकानंद स्मारक अंबाझरी, कृषी विद्यापीठ आदी परिसरातील भिंती आकर्षक चित्रांनी रंगवल्या आहेत मात्र या भिंतीवर सुरक्षेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे आणि नागरिक स्वच्छतेच्या दृष्टीने जागृत नसल्यामुळे शहरातील चित्रकारांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे.

हेही वाचा >>> व्यपगत झालेल्या पदावर अजूनही १८ हजार कर्मचारी कार्यरत, पोलीस विभागातील चित्र

४० लोकांवर कारवाई महापालिकेच्या माध्यमातून भित्तिचित्रांद्वारे रंगवण्याचा उपक्रम राबवला. शहरातील चित्रकार त्यात सहभागी झाले. आता नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. रंगवलेल्या भिंती खराब करणाऱ्या ४० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attractive pictures drawn on the walls of various parts of nagpur to make city clean and beautiful vmb 67 zws