लोकांकिकेनिमित्त लेखकांनी सृजनाचा प्रवास उलगडला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाटकासाठी पहिली गरज असते संहितेची. कारण त्याशिवाय नाटक उभे राहूच शकत नाही. या संहिता निर्मितीच्या कामातील कष्ट, अभ्यास, आनंद, विचार प्रत्यक्ष नाटकाइतकाच आनंददायी असल्याचे लेखकांनी सांगितले. कथाबीज कसे गवसले आणि त्याला अनुरूप पात्रे कशी उभी राहू लागली, याचा वृत्तांतच वीरेंद्र गणवीर, धनंजय मांडवकर, ऋतुराज वानखेडे आणि वैभव देशमुख या लेखक मंडळींनी लोकांकिकेच्या निमित्ताने उलगडला.

वीरेंद्र गणवीर यांना ‘गटार’ या एकांकिकेचे कथाबीज दिल्लीतील वाल्मीकी आणि उत्तर भारतीयांच्या एका मोर्चात गवसले. नाटकात माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याच्या जगण्याचे प्रश्न त्यात आले पाहिजेत, असे मानणाऱ्या लेखकांपैकी गणवीर एक आहेत. ते म्हणतात, दरवर्षीच नवीन एकांकिका लिहायला आवडते. लोकांचे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यांना मुख्य प्रवाहात स्थान मिळत नाही. हा प्रश्न केवळ आर्थिक नाही तर  जाती आधारित प्रश्न असल्याचे दिल्लीतील मोर्चातील लोकांशी बोलताना स्पष्ट जाणवले. स्वातंत्र्यानंतर अनेक आमिषे दाखवून या लोकांना दिल्ली किंवा इतर राज्यात नेण्यात आले. खास करून उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात भागातील वाल्मीकी व सुदर्शन समाजाने अजूनही गटार साफ करण्याची कामे सोडलेली नाहीत. त्यामुळे निर्माण झालेले त्यांच्या आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न ‘गटार’मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला.

धनंजय मांडवकर लिखित ‘बाकी सर्व ठीक आहे’ आणि ‘पंचमवेद’ या दोन एकांकिकांचा समावेश या स्पध्रेत होता. पंचमवेदमध्ये तर नाटक घडत जातानाचा कलावंतांचा संघर्षमय प्रवास नृत्याद्वारे मांडण्यात आला आहे, तर कवी लोकनाथ यशवंत यांच्या कवितासंग्रहातील वेगवेगळ्या कवितांवर आधारित सुटय़ा सुटय़ा कथा तयार करून ‘बाकी सर्व ठीक आहे’ हे नाटय़ रूपांतरण साकारले गेले. त्यासाठी संगीत देताना ईशान चौधरी आणि अभिजीत मेश्राम यांना तारेवरची कसरत करावी लागली.

अमरावतीचे वैभव देशमुख लिखित ‘रूबरू’ हे नाटक एक धाडसी विषय घेऊन आले होते. १५ दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यामुळे त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ‘रूबरू’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. यात तरुणाईच्या लैंगिक भावना ते त्यांच्यापद्धतीने कशा व्यक्त करतात, यावर लिहायचे ठरवले आणि रूबरू ही एकांकिका जन्माला आल्याचे देशमुख म्हणाले.

ऋतुराज वानखेडे यांच्या ‘इंक-क्रेडिएबल फेसऑफ’या एकांकिकेची संहिता आणि सादरीकरण दोन्हीही अप्रतिम होते. दोन अनोळखी महिलांची एक रहस्यमय कथा ऋतुराजने साकारली. तसेच ‘चला निघायची वेळ झाली’ या अमरावतीच्या शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाची एकांकिका

सचिन पोटे यांनी लिहिली असून तिला दीपक नांदगावकर या विद्यार्थ्यांने नाटकाचे रूप दिले. त्यातील स्मशानाचे दृश्य अप्रतिम झाले.

विभागीय फेरीत निवड झालेल्या एकांकिका

१) इंक- क्रेडिएबल फेसऑफ- वसंत शिक्षणशास्त्र महाविद्यालय

२)  अथांग – ललित कला विभाग, नागपूर विद्यापीठ

३)  गटार –  धनवटे नॅशनल महाविद्यालय

४) पंचम वेद – महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय

५) भाजी वांग्याची – राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय