नागपूर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एक जूनपासून ते २७ ऑगस्टपर्यंत संपूर्ण देशभरात आठ टक्के कमी पावसाची नोंद झाली. यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले. एक जूनला केरळात येणारा मान्सून यंदा आठ जूनला आला. महाराष्ट्रात सात जूनला येणारा मान्सून ११ जूनला आला. मात्र, महाराष्ट्रात मान्सून आल्यानंतर तो कोकणातच बरेच दिवस रेंगाळला. कोकणात जवळपास १८ जूनपर्यंत मान्सून राहिला आणि तेथून पुढे त्याची प्रगती होण्यास सुरू झाली. २२ जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. जुलैमध्ये मात्र जोरदार पाऊस झाला आणि जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्रासहीतच दक्षिणेतील इतरही राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि हेच कारण आहे की, देशाचे आत्तापर्यंतचे एकूण पर्जन्यमान आठ टक्क्यांनी कमी झाले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात अपुऱ्या पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

‘या’ जिल्ह्यात पडलाय कमी पाऊस

हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, राज्यात मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडामधील धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, या जिल्ह्यांत ऑगस्ट महिन्यात २० टक्क्यांपासून ते ५९ टक्क्यांपर्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Average of eight percent less rainfall recorded across the country from june to august indian meteorological department rgc 76 css
Show comments