वर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे २०२३ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. हे अभियान १ मे २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान चालले. विभागीय स्तरावर त्यासाठी सर्वेक्षण समिती गठीत झाली. प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यांकन स्थानकाची व प्रसाधन गृहाची स्वच्छता, स्थानक व्यवस्थापन, हरित स्थानक, नियमित स्वच्छता, विविध महोत्सवाचे आयोजन व अन्य निकषावर करण्यात आले. चांगले गुणांकन प्राप्त करणाऱ्या बसस्थानकास पुरुस्कृत करण्यात आले आहे.

नागपूर विभाग – प्रथम काटोल, द्वितीय वर्धा व तृतीय गणेशपेठ नागपूर असे पुरस्कार अ गटात घोषित झाले. त्यांना अनुक्रमे दहा, पाच व अडीच लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार. ब गटात साकोली, चिमूर व गोंदिया तर क गटात लाखनी, देवरी व अर्जुनी मोरगाव येथील स्थानक अनुक्रमे अव्वल आलेत.
अमरावती विभागात अ गटात अकोला यास प्रथम क्रमांक असून उर्वरित क्रमांक नाहीत. ब गटात परतवाडा, नेर व तेल्हारा तसेच क गटात धारणी स्थानकास पुरस्कार आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा

हेही वाचा – अन्… मस्की दाम्पत्यांनी स्वत:ला साखळी बेड्यामध्ये जखडून पिंजऱ्यामध्ये बंद करुन घेतले

नाशिक विभागात अ गटात चोपडा, संगमनेर व कोपरगाव, ब गटात सटाणा, लोणी व राहता तर क गटात कोणीच पुरस्कारप्राप्त नाहीत.
पुणे विभागात फलटण, गडहिंग्लज व दहिवाडी, ब गटात अकलूज, कराड व चंदगड, तर क गटात मेढा, औध व पुसेसावळी.

मुंबई विभागात केवळ ब गटात वेंगुर्ला स्थानकास पुरस्कार देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात अंबेजोगाई, निलंगा व वैजापूर, ब गटात अंबड, लातूर व हिंगोली तर क गटात भोकर, धर्माबाद व शिरूर अनंतपाळ या स्थानकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ब गटात पहिल्या तीन क्रमांकास पाच, अडीच व दीड लाखाचा पुरस्कार आहे तर क गटात एक लाख, ५० हजार व २५ हजार रुपयाचा पुरस्कार मिळणार.

हेही वाचा – महाराष्ट्रात आणखी एक भावी मुख्यमंत्री….

या स्पर्धेत १०० पैकी ७० गुण मिळणे आवश्यक होते. म्हणून ज्या विभागात ७० पेक्षा कमी गुण मिळाले आहेत त्या विभागात त्या त्या गटात पुरस्कार देण्यात आलेले नाही. पुरस्काराची रक्कम वर्षभरात स्वच्छता कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे वर्धा बस आगारप्रमुख सांगतात.