लोकसत्ता टीम

वर्धा: देवळी तालुक्यातील ५० कष्टकरी, शेतमजूर महिला प्रभू रामाच्या दर्शनासाठी थेट अयोध्येस निघाल्या आहेत. अयोध्येतील नवे राम मंदिर, सीता मंदिर, शरयू घाट हे स्थळ आहेतच. पण जातांना वाटेत मय्यर येथील देवी दर्शन पण घेणार. प्रवास तसेच भोजन, निवास व्यवस्था खासदार रामदास तडस व त्यांच्या माजी नगराध्यक्ष पत्नी शोभा तडस यांनी पुरस्कृत केली आहे.

aditi tatkare ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: आता ‘या’ महिलांनाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, संख्या १२ लाखांच्या घरात!
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
BJPs attempt to balance power in ahilyanagar with elect Ram Shinde As Speaker of Legislative Council
राम शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यात सत्ता समतोलाचा भाजपचा प्रयत्न
robbery jewelery Lonavala, robbery Lonavala,
लोणावळ्यात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ, महिलांमध्ये घबराट
Women jewelery theft Alandi, Women jewelery Alandi,
पुणे : दुचाकीवरील महिलेकडील चार लाखांचे दागिने चोरले, आळंदी रस्त्यावरील घटना
kisan kathore meet nitin gadkari
किसन कथोरेही नितीन गडकरींच्या भेटीला, मुरबाड मधील विकास कामांवर चर्चा
thane water shortage at titwala manda
कल्याण : टिटवाळा – मांडा भागात पाणी टंचाई, महिलांचा अ प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा
panvel three woman stolen Rs 1 85 lakh and jewels from gold jewellery shop
अवघ्या सहा मिनिटांत सोनाराला महिलांचा गंडा

यातील काही महिला तर कधीच जिल्ह्याबाहेर पण गेलेल्या नाहीत. वारी तर दूरच. हा असा योग आल्याने त्या सर्व आनंदित झाल्या आहेत. पण असा दौरा कश्यासाठी, असा प्रश्न येताच खासदार विरोधक आगामी लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधतात. निवडणूक जवळ आली की असे उपक्रम होतच असल्याचे विरोधक म्हणत आहे. तडस आता तिसऱ्यांदा रिंगणात उतरणार, असे ते सांगतात. मात्र असे काही नसल्याचे तडस यांचे जनसंपर्क अधिकारी विपीन पिसे निक्षून सांगतात.

आणखी वाचा-नितीन गडकरींकडे सहा विद्यापीठांची डी.लिट, आता फडणवीसांनाही…

गत नऊ वर्षात खासदार महोदयांनी अनेकांना विविध राज्याचा तसेच दिल्लीचा दौरा घडविला. शोभाताई यात आग्रही असतात. कष्टकरी महिलांना देव दर्शनाची संधी मिळत नाही. तेवढी सोय नसते. म्हणून अश्यांसाठी खासदार दंपती व्यवस्था करतात. या महिला भाविकांच्या दर्शन जथ्याचे नेतृत्व खुद्द खासदार अर्धांगिनी शोभाताई करीत आहे. त्या म्हणतात की सामान्य महिलांनाही प्रभू रामचंद्र दर्शनाची ओढ असते. माझ्या संपर्कातील काही कष्टकरी महिलांनी ही भावना बोलून दाखविली. तेव्हा मलाही वाटले की यांना पण सोबत घेवून अयोध्या वारी करावी. म्हणून मी स्वतः सोबत जात आहे.

आता शेतीची कामे जवळपास आटोपली असल्याने अनेकांची ईच्छा होती. पण उर्वरित महिलांना पुढील वेळी नेणार, असेही त्या म्हणाल्या. या वातानुकूलित गाडीला खासदारांनी हिरवी झेंडी देत रवाना केले. त्या परिसरातील शेती व्यवसायाचे पण महिला अवलोकन करतील. सोबत माजी नगराध्यक्ष सुचिता मडावी तसेच ज्योती खाडे, सारंगा मडावी, माया वाडेकर, सुनीता बकाने, शुभांगी कुर्जेकर व अन्य आहेत.

Story img Loader