नागपूर : डोळे येऊ नये म्हणून आपली आजी अनेक उपाय करत होती. मात्र, आपण ते विसरत चाललो आहोत. डोळे येण्याची साथ आता सर्वत्र सुरू आहे. डोळे आले नसतील तरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक गोष्ट करता येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धूर करायचे म्हणजे घरात खूप धूर करायचे असे नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याचा वापर होईल. डोळे येणे म्हणजे डोळे लाल होणे, त्यातून पिवळा असा पदार्थ बाहेर येणे, खाज सुटणे, डोळे लाल होणे होय. सध्या ही साथ सर्वत्र पसरली असून दुकानात डोळ्यांच्या औषधांचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे डोळे येण्यापासून बचाव होण्यासाठी हा घरघुती उपाय करणे अत्यंत आवश्यक राहणार आहे. यामुळे घरातील कुणालाही त्रास होणार नाही.

हेही वाचा – आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्‍याची धमकी; कारण काय? वाचा..

हेही वाचा – “गाळेधारक म्हाडाचे लाभार्थी नसून ग्राहकच!” यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निर्णय

आयुर्वेदिक डॉक्टर विराज गीते यांनी सांगितले की, एका वाटीमध्ये कापूर घ्यायचे आहे. त्यासोबत लसन लागणार आहे. लसनाच्या बाहेरचे साल काढून घ्यायचे आहे. हे लसनाचे साल आणि कापूर पेटवायचा आहे. यापासून धूर निघणार आहे. हा धूर डोळ्यामध्ये गेल्याने आराम होतो. याशिवाय लहान मुलांचे डोळे आल्यास गाजर आणि पालक याचा रसही देता येऊ शकतो. पालकचा रस मुलांना देता येईल. तसेच गाजरचा रसही घेता येईल. यामुळे डोळे आल्यास आराम वाटेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurvedic doctor remedy to prevent eye disease dag 87 ssb
Show comments