नागपूर : एका युवा व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता नवीन कामठीत उघडकीस आली. आयुष अजय त्रिवेदी (२६, ऑरेंज सीटी, राजा रॉयलजवळ, नवीन कामठी) असे मृत युवकाचे नावे आहे. अजय त्रिवेदी हे सावनेर-कामठी परीसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड होते. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आयुष हे कर्जबाजारी झाले. त्यामुळे ते तणावात राहत होते. त्यांनी सकाळी घरात एकटे असताना डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. गोळी झाडण्याचा आवाज आल्यामुळे कुटुंबियांनी घरात धाव घेतल्याने ही घटना उघडकीस आली. कुटुंबियांना आयुष हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आयुषनकडे पिस्तूल आली कुठून, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नागपूर : कर्जबाजारी युवा व्यावसायिकाची आत्महत्या
एका युवा व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता नवीन कामठीत उघडकीस आली.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 30-05-2023 at 16:50 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayush ajay trivedi suicide of a debt young businessman adk 83 ysh