नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये सिनेट परिवर्तन पॅनलच्या वतीने पीएच.डी. शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी शैक्षणिक परिसराचे प्रवेशद्वार बंद करुन विद्यार्थी आंदोलनात आझादीचे नारे देत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
नागपूर विद्यापीठाने काही महिन्यांनाधी पीएचडी शुल्कात वाढ केली. या वाढीला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. या शिवाय महाविद्यालयात सुरू होऊनही अद्याप कमवा आणि शिका ही योजना सुरू केली नाही याविरोधात आता विद्यापिठात आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनादरम्यान प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच यावेळी आझादीचे नारे देण्यात आल्याने आंदोलनाला वेगळे वळण देण्यात आल्याचे चर्चा होती.